जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात सर्व विभागांच्या अंतर्गत “फॅशन शो तसेच पर्सनॅलिटी कॉन्स्टेंट २०२२” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाश्चिमात्य देशातील आणि भारतातील आजच्या काळाला अनुसरून विध्यार्थ्यानी फॅशन शो मध्ये वेगवेगळ्या थीमवर वस्त्र परिधान करून रसिकांची मने जिंकली.
यामध्ये इंडो वेस्टर्न, वेस्टर्न, रेनबो थीम, पारंपारिक, बॉलीवूड, पुष्पा टाॅलीवूड इत्यादी विविध पद्धतीच्या ड्रेसमधील विध्यार्थ्यानी प्रदर्शन करून मनोवेधक सादरीकरण केले. तसेच पर्सनॅलिटी कॉन्स्टेंटमध्ये परीक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नाची स्पर्धकांनी अचूक उत्तरे देत आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत आपल्यात असलेल्या विविध कलागुणांचे सादरीकरण देखील यावेळी स्पर्धेत केले. रसिक विध्यार्थ्यानी या “फॅशन शो”ला भरभरून प्रतिसाद देत आनंद लुटला. यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात नमूद केले कि स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय दैनंदिन व्यवहारांमध्ये स्वतःला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची निकड जाणवू लागली आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांत आत्मविश्वास, स्टेज डेअरिंग व परिश्रम क्षमता विकसित करण्यासाठी असे अनोखे कल्पक व अभिनव कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करून त्याद्वारे विध्यार्थ्याना बुद्धिमत्ता व सुप्त सामर्थ्य प्रदर्शित करण्याची संधी देण्यात येते असे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचे समन्वयक प्रा. राहुल त्रिवेदी व प्रा. प्रिया टेकवानी हे होते तर प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया व प्रा. वसीम पटेल यांचे सहकार्य लाभले
अविनाश जोशी व समीक्षा शर्मा या विध्यार्थ्यानी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व रायसोनी अभियांत्रिकीचे ऑकडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी कौतुक केले. हे ठरले “फॅशन शो” व “पर्सनॅलिटी कॉन्स्टेंट” चे हिरो
यावेळी स्पर्धेत इंट्रोडक्शन, टॅलेन्ट व परीक्षकांचे प्रश्न अशा आशयांच्या तीन फेऱ्या घेण्यात आल्या या अनुषंगाने मिस्टर जी. एच. रायसोनी सुयोग कलानी तर मिस जी. एच. रायसोनी बुश्रा पठाण यांना यावर्षीचा फॅशन शो सर्वोत्कृष्ट किताब देण्यात आला. तसेच बेस्ट वॉक – राहुल पिंगळे, बेस्ट आईज- मूनमून दास, बेस्ट स्माईल – लीना तातिया,बेस्ट पोटेन्शीयल- अर्शिया इलयास, मिस्टर कॉन्फीडन्ट- विवेक पाटील, मिस कॉन्फीडन्ट- कांचन माळी, परीक्षक विशेष निवड- प्रेरणा नेगी यांना या टायटलचे पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. सदर स्पर्धेचे परीक्षण डीसीबी बँकेचे असोसियेट व्हाईस प्रेसिडेंट निरंजन देशमुख, प्रा. डॉ. मोनाली शर्मा व प्रा. तन्मय भाले यांनी केले