---Advertisement---
कृषी जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात चांगलीच घट झाली आहे. याचबरोबर येत्या काळात हवामान विभागाकडून थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. कित्येक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पर्यायी याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो असे म्हटले जात आहे. (farmer in worry in jalgoan district)

farmer jpg webp webp

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये शेतीच्या पिकांना याचा धोका निर्माण झाला आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू , हरभरा पिकांची काढणे करण्यात सुरुवात झाली आहे. त्यात अनेक ठिकाणी त्याची तयारी सुरू आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते असे म्हटले जात आहे.(worry farmer in jalgaon)

---Advertisement---

खरिपात आधी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र आता रब्बी हंगामात शेतकरी आशावादी होते. अशातही वातावरण ढगाळ झाल्याने हे देखील पीक धोक्यात आले आहे. पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---