जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर मिळणार हरभरा, ज्वारी, मका व गव्हाचे बियाणे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके व बियाणे लागवड उप अभियानांतर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम या दोन योजनेंतर्गत हरभरा, ज्वारी, मका व गहू या बियाणांचे वाटप अनुदान तत्वावर होणार आहे.

रब्बी हंगामात हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण या बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा पिकाचे १० वर्षाआतील पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, आरव्हीजी-२०२ व बीडीएनजीके-७९८ या वाणांचे एकूण ६२९१ प्रमाणित बियाणे २५०० रुपये प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. भरडधान्य योजनेंतर्गत ३५४ मका पिकासाठी ७५० रुपये प्रती किलो अनुदान तसेच रब्बी ज्वारीसाठी रुपये ३० प्रती किलो १० वर्षे आतील वाणासाठी ४६० क्विंटल व ११० क्विंटल, १० वर्षेवरील वाणासाठी १५ रुपये प्रती किलो अनुदान तत्वावर बियाणे वितरण होणार आहे.

तसेच २०२१-२२ बियाणे व लागवड उप अभियानाअंतर्गत ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत १० वर्षावरील जॉकी ९२१८ या वाणाचे एकूण १२०० क्विंटल प्रमाणित बियाणे २५०० रुपये प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन आहे. ५३७३ क्विंटल इतका गहू १६०० रुपये प्रति क्विंटल अनुदानाने वितरीत केला जाणार आहे. या योजनेत प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत लाभ देय आहे.

या अनुदान तत्वावर बियाणेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, अधिक माहितीसाठी जवळच्या उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, जळगाव व महाबीज यांचे अधिकृत वितरक यांच्याशी देखील संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button