⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

ढगाळ वातावरणामुळे धरणगाव तालुक्यात शेतकऱ्यांची धावपळ

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । धरणगाव शहर व तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच पावसाची शक्यता वाटू लागल्याने शेतकऱ्यांची धावपळ पहायला मिळाली. तर अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले.

सध्या परिसरात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कडक उन्हापासून दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात वाढलेल्या भारनियमनाने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. दरम्यान, सध्या शेतात हरभरा, दादर, बागायती ज्वारी, मूग, ऊस, पपई यांच्या काढणीची लगबग सुरू आहे. तर मे महिन्यात कापूस लागवडीसाठी बागायतदार शेतकरी शेत जमिनी तयारी करण्यात व्यग्र आहेत. यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास काही शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसात कडक उन्हामुळे अनेकांची लाही-लाही होत असताना वीज मंडळाने भारनियमन वाढवल्याने ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.