⁠ 
बुधवार, जुलै 24, 2024

जळगाव जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ६७६ कोटी जमा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश !

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२४ । जळगाव जिल्ह्यातील २ लाख १८ हजार २५४ शेतकऱ्यांच्या थेट खात्यात तब्बल ६७६ कोटींहून अधिकची रक्कम जमा झाली आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना तसेच हवामान आधारित फळपीक विमा योजनेत पात्र ठरून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यांचा लाभ मिळाला असून लाभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यानिमित्ताने मोठे यश प्राप्त झाले आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश !
पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार” सन २०२२-२३ वादळी वारे व गारपीटने नुकसान झालेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक ३५ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १३९ कोटी ९ लाख ८६ हजार ३२९ रुपयांची नुकसान भरपाईचा लाभ मंजुर झाला असून हा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. तर तापमानातील निकषाप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळातील पात्र ६७ हजार ४९ शेतकऱ्यांच्याही खात्यात तब्बल ४५४.६९ कोटी रुपये जमा झाले आहेत. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला होता.

पालकमंत्र्यांनी दिले तक्रार निवारण समितीला विशेष अधिकार !
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील अनेक बैठका घेतल्या. तसेच सतत पाठपुरावा केला. एवढेच नव्हे तर जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे विशेष अधिकार दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींवर स्थानिक पातळीवरच तात्काळ निर्णय घेण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांची कोर्टाची पायपीट थांबली व त्यांना तात्काळ विम्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता शेतकऱ्यांना कोर्टाची पायरी चढायला लागून नये, यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे विशेष अधिकार दिले. यामुळे शेतकऱ्यांच्या दाव्यांवर समितीने जलदगतीने निर्णय घेतले.

पंतप्रधान फसल विमा योजनेतही दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळवून दिला लाभ !
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंतप्रधान फसल विमा योजनेतही जळगाव जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार २०५ शेतकऱ्यांना तब्बल ८२.५२ कोटींचा लाभ मिळवून दिला आहे. पंतप्रधान फसल विमा योजनेत अवघ्या १ रुपयात पीकविमा काढला जातो. त्यानुसार पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील १ लाख ५१ हजार २०५ शेतकरी पात्र ठरले. त्यानुसार आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर निकषानुसार पात्र रक्कम खात्यात वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान फसल विमा योजना आणि “फळ पिक विमा योजनेत जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळण्याचा कदाचित हा पहिलाच प्रसंग असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आभार मानले आहेत.