⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | बरे झालेल्या रुग्णांना कडुलिंबाचे रोपटे देऊन निरोप

बरे झालेल्या रुग्णांना कडुलिंबाचे रोपटे देऊन निरोप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । कोविडची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. प्रशासनासोबतच रुग्णालये, कोविड सेंटर, सेवाभावी संस्था डॉक्टर, परिचारिका, कार्यकर्ते या सगळ्यांचे प्रयत्न व नागरिकांच्या सहकार्याला यश येत आहे. त्यामुळे जिल्यात व शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढता प्रकोप बघून लोकसंघर्ष मोर्चाने येथील ‘शासकीय तंत्रनिकेतन’च्या इमारतीत अडीच महिन्यांपूर्वी कोविड केअर सेंटर सुरु केले होते. सेंटरमध्ये आजपर्यंत एकूण 936 रुग्ण दाखल झाले आहेत व तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि समर्पित कार्यकर्त्यांच्या धडपडीमुळे तब्बल ९२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूचे महत्व आणि मूल्य सर्वांनाच लक्षात आले आहे. म्हणूनच सुटी झालेल्या रुग्णांना लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने कडूनिंबाचे रोप दिले जाते. ते जगविण्याचे व वाढविण्याचे वचनही घेतले जाते.

नुकतीच सुटी झालेल्या रुग्णांनाही लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने रोप उपलब्ध करून देऊन त्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी सचिन दादा धांडे, भरत कर्डिले, पिंटू राज निंबाळकर, चंदू साळुंखे, कलींदर तडवी, विनायक चौधरी, सीमा तायडे, पूजा लोखंडे, पायल तरडे, सोनाली शिंदे, सोनिया कजबे, दिपाली भालेराव व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.