जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात मराठी राजभाषा दिवस निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रविण महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून किमान कौशल्य विभागाचे प्राध्यापक प्रदीप पाटील, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संगीता माळी व अंकिता वाणी उपस्थित होते. सर्वप्रथम माता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात मराठी वेशभूषा सर्व विद्यार्थांनी सादर केलेली होती. यात मॉ. जिजाऊ, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, तानाजी मालुसरे, संत तुकाराम, वारकरी, विठ्ठल, साने गुरुजी, अहिल्याबाई होळकर, प्रतिभाताई पाटील, डॉ बाबासाहेब असे अनेक पोशाख परिधान करून विद्यार्थांनी अभिनय सादर केला.
या कार्यक्रमाचे नियोजन तुषार रंधे व पूजा पाटील यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..