---Advertisement---

अभिनामास्पद : जळगावच्या सायकलवीरांनी ४० तासात पूर्ण केले ६०० किमी अंतर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२३ । ऑडक्स इंडिया रॅडोनिअरच्या वतीने ६०० किलोमीटर सायकलिंगचे आयोजन करण्यात आले होते. यात जळगावच्या सात जणांनी ४० तासांत ६०० किलोमीटर सायकलिंग पूर्ण केली. यामुळे आता हे सर्व सायकल वीर सुपर रॅडोनिअर पदवीसाठी पात्र ठरले आहेत. याचबरोबर इतर तिघांचे वेळेचे गणित चुकल्याने ‘लेट फिनिशर ठरले आहेत.

jalgaon cycle jpg webp webp

जळगाव ते मालेगाव व्हाया एरंडोल, पारोळा, धुळे तर मालेगाव ते जळगाव आणि जळगाव ते बाळापूर (अकोला),बाळापूर ते जळगाव असे ६०० किलोमीटर अंतर या सायकलिंगचे टार्गेट होते. त्यात जळगावचे नीलेश चौधरी, सखाराम ठाकरे, राम घोरपडे, वरणगावचे युवराज सूर्यवंशी, भुसावळचे रविकांत पवार, भाऊसाहेब पाटील असे सात जण ‘एसआर’ म्हणून पात्र ठरले आहेत

---Advertisement---

जळगावचे भूपेश व्यास, आरती व्यास, प्रदीप सोलंकी यांनी निर्धारीत वेळेपेक्षा एक तास उशिराने आल्याने ते ‘लेट फिनिशर’ म्हणून गणले गेले. यावेळी त्यांचा जळगावात त्यांचा मित्रपरिवाराने गौरव केला.

६०० किलोमीटरचे ध्येय पार करतांना रात्रीच्या काळाकिभिन्न अंधारात रातकिड्यांचा किर्र किर्र आवाज यायचा. अंगाला झोंबणारा सोसाट्याचा वारा असायचा. महामार्गावरून वेगाने धावणारी वाहने जवळून गेली की अंगाचा थरकाप उडायचा. सायकलीला वाट दिसेल इतका उजेड देणाऱ्या बॅटरीचा पुढे केवळ ध्येय दिसत होते. रस्त्यात पायाला किरकोळ जखमा झाल्या. पण द्याय अपूर्ण सोडायचा विचार कोणाच्याच मनात आला नाही.

काय आहे सुपर रॅडोनिअर ?

६०० किलोमीटरचे अंतर ४० तासांत पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला सुपर रॅडोनिअर पदवी दिली जाते. अंतर नियोजित वेळेपेक्षा उशिराने पूर्ण करणाऱ्याला लेट फिनिशर म्हणून ग्राह्य धरले जाते असा नियम आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---