जळगाव शहर
प्रसिद्ध अभिनेते समीर चौघुलेंच्या हस्ते रमेशकुमार मुनोत यांना जीवनगौरव प्रदान
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । येथील नामांकित ओम साई रिअल इस्टेट कॅन्सलटन्टचे संचालक रमेश कुमार मुणोत यांना प्रेरणा दर्पण फाउंडेशनचा “जीवनगौरव पुरस्कार” सुप्रसिद्ध मराठी अभिनेता हास्य जत्रा फेम समीर चौघुलेंच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध मान्यवरांना दरवर्षी सन्मानित करण्यात येते. आपला व्यवसाय सांभाळत ओम साई रिअल इस्टेट कॅन्सलटन्टचे संचालक रमेशकुमार मुणोत यांनी सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले असून या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रेरणा दर्पण फाउंडेशन या संस्थेने “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.