जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । अख्ख कुटुंब मुलाच्या लग्नाला गेल्याची संधी हेरत अज्ञात चोरट्यांनी घरात डल्लामारून तब्बल १ लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत अमळनेर पोलिसांत अज्ञात भामट्यांविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेशवर यशवंत सोमवंशी (वय ६१ रा.ढेकु रोड हरिओम नगर अमळनेर ) यांनी पोलिसांत फिर्यादी दिली. यांचे अख्ख कुटुंब मुलाचे लग्न असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेळा येथे गेले. दरम्यान, त्याचा फायदा घेत अज्ञात चोरटयांनी त्यांच्या घरात डाव साधत घरातील ५३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ८० हजार रोकड असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्या. ही घटना ज्ञानेशवर यशवंत सोमवंशी यांचे कुटुंब लग्न सोहळा आटपून घरी आल्यावर उघडीस आली.
याबाबत ज्ञानेशवर यशवंत सोमवंशी यांनी अमळनेर पोलिसांत दि. १ रोजी फिर्यादी दिली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांनी भेट दिली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहे.