---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य

गृहिणींना दिलासा! तूरडाळीच्या दरात मोठी घसरण, पहा आताचा प्रति किलोचा भाव?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२५ । गेल्या काही महिन्यापूर्वी १७० ते १८० रुपये किलोवर गेलेल्या तूरडाळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या बाजारात तूरडाळीची मुबलक आवक सुरू असल्यामुळे मागील महिन्याच्या तुलनेत तूरडाळीच्या दरात प्रति किलोमागे २० रुपयांनी घट होऊन दर १२० रुपयांवर आले आहेत.

turdal jpg webp webp

तर दुसरीकडे हरभऱ्याचे उत्पादन जास्त असूनही हरभरा डाळीच्या दरात प्रतिकिलो १५ रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी बेसनच्या दरात प्रतिकिलो २० रुपये वाढ झालेली आहे.

---Advertisement---

मागील वर्षी १८० रुपयांनी तर गेल्या महिन्यात १४० रुपये प्रति किलोने तूरडाळीची विक्री होत होती. या आठवड्यात मात्र १२० रुपयांपर्यंत दर खाली आले आहेत. गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हरभरा डाळीच्या दरात मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत १५ रुपयांनी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात हरभरा डाळ ७० ते ७२ रुपयांपर्यंत होती. या आठवड्यात त्याचे दर ८५ ते ९० रुपये प्रति किलो इतके होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment