जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२४ । राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढले आहेत. मात्र आता उन्हाळी कांदा जवळपास संपला असल्याने नवीन लाल कांद्याची आवक वाढला. परिणामी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली.
चाळीसगावमध्ये नवीन कांद्याची आवक वाढल्याने दोन दिवसातच कांद्याच्या दरात क्विंटलमागे १४०० ते १५०० रूपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला.
शुक्रवारी बाजार समितीत कांद्याची तब्बल ३५४ वाहने आली होती. मात्र या नवीन लाल कांद्याला सरासरी किमान २९०० रूपये असा दर मिळाला. १० रोजी कांद्याचे हेच दर ४४०० रूपये प्रतिक्विंटल असे होते.