जळगाव जिल्हाजळगाव शहर

बनावट वेबसाईट : विमा कंपनीच्या निवृत्त अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ डिसेंबर २०२१ । विमा कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी चंद्रशेखर संतोषराव देशमुख (वय ६७, रा. एसएमआयटी कॉलनी) यांना दोन अनोळखी व्यक्तींनी व्हॉट्सऑप कॉल करून एक बनावट वेबसाइट पाठविली. त्यावर ट्रेडिंग खाते तयार करून त्यावर आभासी नफ्याचे आमिष दाखवून या सायबर गुन्हेगारांनी ७ लाख ५६ हजार ६५४ रुपयांत ऑनलाइन गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, विमा कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या देशमुख यांना डिसेंबर २०२० ते २९ नोव्हेंबर २०११ या कालावधीत शक्ती व रिचर्ड्स नावाच्या दोन अनोळखी व्यक्तींनी व्हॉट्सऑप कॉल करून एक बनावट वेबसाइट पाठविली. त्यावर ट्रेडिंग खाते तयार करण्यास सांगून या खात्यात आभासी नफा दाखवला. त्या नफ्याच्या ५० टक्के रक्कम भरण्यास सांगितले.

देशमुख यांनी वेळोवेळी या सायबर गुन्हेगारांना ६ लाख ५४ हजार १८९ रुपये ऑनलाइन पाठविले. यानंतर देशमुख यांनी नफ्याची रक्कम मागितली असता आणखी एकाने १ लाख ३ हजार ४६५ रुपये परस्पर ऑनलाइन वळवून घेतले.

या प्रकरणात देशमुख यांचे ७ लाख ५६ हजार ६५४ रुपये ऑनलाइन गेले. ना नफा मिळाला ना भरलेली रक्कम परत मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर देशमुख यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार शक्ती, रिचर्ड्स व आणखी एका जणाविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button