---Advertisement---
गुन्हे यावल

विनयभंग करणाऱ्या महाराजला पोलीस कोठडी

faizpur
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ ।  फैजपूर येथील धार्मिक प्रवचनकार महाराज पूर्णानंद विनायक पाटील याने एका अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद कृत्य केले होते. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर महाराजला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

faizpur

दरम्यान, या विकृत इसमाने यापूर्वी देखील असे कृत्य केले असल्याचे बोलले जात असून त्यावेळी काही प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्तक्षेपामुळे पुर्णानंद पोलीस कारवाई पासून बचावला होता.परंतु काल मात्र पुर्णानंदने कहरच केला असून आपल्या मुलीच्या वयाच्या अवघ्या १५ वर्षांच्या मुलीवर हात टाकण्याचा प्रयत्न या महाराज ने केला होता.यामुळे चिडलेल्या कुटुंबियांनी या विकृत इसमाला चांगलाच चोप दिला व पोलीसांच्या हवाली केले आहे.पुर्णानंद वर पोलीसांनी सी.सी.टी.एन.एस.गुरनं.६३/२०२१ भारतीय दंड विधान कलम-३५४(अ),४५२ पोक्सो कायदा कलम-८ प्रमाणे काल उ. रात्रौ १:३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून पुर्णानंद यास फैजपूर पोलीसांनी सकाळी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

---Advertisement---

या घटनेचा पुढील सविस्तर तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे साहेब व फैजपूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रोहीदास ठोंबरे साहेब व अंमलदार मदीना तडवी व त्यांचे सहकारी हे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---