गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

जानेवारी 30, 2026 5:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील समुदाय आरोग्य परिचर्या विभागाच्यावतीने प्रोफशनल एथिक्स, लिगल रिस्पॉन्सीबिलीटी अ‍ॅन्ड फॅकल्टी रोल मॉडेलिंग या विषयावर प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

pradhyapak day

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य महादेव गायकवाड, शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या व्याख्याता रेबिका लोंढे यांनी उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये व्यावसायिक नैतिकता, कायदेशीर जबाबदार्‍या तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आदर्श भूमिका कशी निभावावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यापन करताना नैतिक मूल्ये व कायदेशीर चौकटीचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, यावर विशेष भर देण्यात आला. या कार्यक्रमास गोडावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य, उपप्राचार्य तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. समुदाय आरोग्य परिचर्या विभागातील व्याख्याते तसेच इतर विभागांतील प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. श्री. गायकवाड यांच्या अभ्यासपूर्ण व प्रभावी मार्गदर्शनामुळे उपस्थित प्राध्यापकांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

सहभागी प्राध्यापकांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत हा उपक्रम व्यावसायिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे नमूद केले. या कार्यक्रमामुळे प्राध्यापकांची जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली असून नर्सिंग शिक्षणाच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now