गुन्हेजळगाव शहर

Jalgaon : मी कालच मरणार होती; पण.. सुसाईट नोट लिहून 10वीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२३ । जळगावमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. शिक्षणासाठी जळगावातील काका-काकूंकडे राहणाऱ्या धरणगावच्या 10वीच्या विद्यार्थिनीने सुसाईड नोट लिहून टोकाचं पाऊल उचललं. तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कृष्णाप्रिया अरुण पाटील (१५) असे मृत मुलीचे नाव असून ही घटना रामानंदनगर पोलिस हद्दीतील ६९, शास्त्रीनगरातील स्वामी समर्थ केंद्रासमोरील घरात घडली.

या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. सतखेडा (ता. धरणगाव) येथील कृष्णाप्रिया शिक्षणासाठी जळगावला काका-काकूंसोबत मागील वर्षापासून राहत होती. आई-वडील लहान अपंग भाऊ आणि बहिणीसोबत गावी राहतात. शनिवारी ती काका-काकूंसोबत पेरणीसाठी गावी गेली होती. मात्र बुधवारी सकाळी ती एकटीच परत जळगावला आली. त्यानंतर तिने आपले जीवन संपवले.

वेळ सकाळी ८ वाजून ५० मिनिटे : ‘मी मरेल!, कारण काय मलाच माहीत नाही. एकटं एकटं वाटते. म्हणजे असे की जगून काहीच फायदा नाही. पण मी मरेल, मला माफ करा. मी तुमचे स्वप्न पूर्ण करण्याआधीच मरेल. पण काय करू? माझ्या विचारांचा पूर्णपणे घोळ झाला आहे. प्रत्येक क्षणाला २-२ विचार येतात. जगातील सर्व दुश्मन आहेत. मी कालच मरणार होती. पण हिंमत झाली नाही. आज हिंमत करेल आणि मरेल. मरावे असे काही कारण पण नाही. पण जगून काय मिळेल. सॉरी, पण तुमचे नाव बदनाम होणार नाही. आपल्या घरचं नाव बदनाम होण्याचे कारण पण नाही. अप्पाची ट्रीटमेंट राहून जाईल, अशी चिठ्ठी तिने लिहून ठेवली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button