---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

फेसबुक वर आक्षेपार्ह मजकुर टाकल्याप्रकरणी गुन्ह्यासह अतीरीक्त कुमक दाखल !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । एरंडोल येतील मंगेश विलास भोई वय २६वर्षे रा.भोई गल्ली या संशयीत आरोपीने सायंकाळी ६वाजेच्या सुमारास आपल्या फेसबुक अकाऊंट वर नुपुर शर्मा च्या फोटोवर ‘Support nupoor sharma, अश्या आशयाचा मजकूर टाकून शेख मोहसिन रजा याने त्याच्या फेसबुक अकाऊंट वर टाकलेल्या पोस्ट वर देखील ‘Support nupoor sharma, व नुपुर शर्मा का बाल भी बाका नही होगा ..असा मजकूर टाकण्यात आला त्यामुळे मुस्लिम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा अपमान करून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या व जातीय तेढ निर्माण करण्यात आली या आशयाची फिर्याद माजी नगरसेवक अस्लम रशीद पिंजारी यांनी एरंडोल पोलिस स्टेशन ला दिली.

facebook hackers jpg webp

संशयीत आरोपी मंगेश भोई यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटक करण्याची कारवाई राञी उशिरा पर्यंत सूरू होती. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला गुन्हा रजी.नंबर १०९/२२ भारतीय दंड संहीता कलम २९५(अ),१५३(अ),६० (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान.. आर. सी. पी. प्लाटून(जळगाव),पारोळा व धरणगाव येथील पोलिस निरीक्षक व कर्मचारी यांना पाचारण करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहीरे, हेड काँन्स्टेबल सुनिल लोहार, मंगलसिंग पाटील,अनिल पाटील,जुबेर खाटीक, राजेश पाटील व किरण पाटील हे पुढील तपास करीत आहेत

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---