बुधवार, सप्टेंबर 13, 2023

प्रवाशांना दिलासा! भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांना मुदतवाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२३ । रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने भुसावळमार्गे धावणाऱ्या मुंबई-रीवा (Mumbai Reva आणि पुणे-जबलपूर (Pune-Jabalpur Express) या विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आलीय. रेल्वे गाड्यांना प्रवाशांची असलेली अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

02188 विशेष मुंबई-रीवा ही गाडी 29 सप्टेंबरपर्यंत दर शुक्रवारी चालविली जायची, तिला 1 डिसेंबरपर्यत मुदतवाढ दिली आहे. तसेच 02187 ही विशेष गाडी 28 सप्टेंबरपर्यत दर गुरूवारी चालविली जात होती, ती आता 30 नोव्हेंबरपर्यत मुदतवाढ दिली आहे तसेच 02131 पुणे -जबलपूर ही सुपरफास्ट विशेष गाडी 24 सप्टेंबरपर्यत दर सोमवारी चालत होती ती आता 25 नोव्हेंबरपर्यत चालविली जाणार आहे.

02132 जबलपूर-पुणे सुपरफास्ट स्पेशल ही गाडी 24 सप्टेबर दर रविवारी चालविली जात होती, ही गाडी आता 26 नोव्हेंबरपर्यत चालविली जाणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, आणि गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या गाड्यांचे आरक्षण 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले आहे.