जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ दिली. त्यामुळे, ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज भरले नाहीत, त्या लाडक्या बहिणींना आपले अर्ज भरता येणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र, हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरण्यात यावेत, अशी सूचना शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे, लाडक्या बहिणींना आता नव्याने अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. पुढील 4 दिवसांत अर्ज करुन या योजनेचा लाभ घेता येईल.
राज्यात आत्तापर्यंत 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात 5 महिन्यांच्या हप्त्याचे ७५०० हजर रुपये सरकारकडून जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांचे अर्ज स्विकारले गेले नाही. दरम्यान, अनेक महिलांना अर्ज करताना काही समस्या आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे अर्ज मान्य झाले नाहीत. त्यामुळेच आता या महिलांनाही अर्ज करण्यासाठी संधी मिळाली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता फॉर्म कसा भरायचा?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरु शकतात.https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात.
लाडकी बहीण योजनेची वेबसाइट ओपन झाल्यानंतर Applicant Login सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचे अकाउंट क्रिएट करा.
यानंतर तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, गाव याबाबत सर्व माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून साइन अप करा.
यानंतर तुमचं अकाउंट तयार होईल.
यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून इन करा.
तिथे तुम्ही Application Of Mukhyamantri-Majhi Ladki Bahin Yojana वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमची आवश्यक माहिती भरा.
यानंतर तुम्ही तुमचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड अपलोड करा. त्यानंतर सबमिट करा. तुमचा फॉर्म सबमिट झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल.
योजनेचा स्टेट्स कसा चेक करायचा?
सर्वप्रथम तुम्ही या पोर्टलवर जाऊन मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.
त्यानंतर Applications made Earlier वर जाऊन स्टेट्स चेक करा.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही अंगणवाडीत जाऊनदेखील भरु शकतात. अंगणवाडी सेविकांकडून तुम्ही हा अर्ज भरुन घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड,रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड हे कागदपत्र अपलोड करा.