जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२५ । भुसावळ मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. अशाच मध्य रेल्वेने भुसावळमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या नवीन गाडीच्या कालावधीत वाढ केली. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस -धनबाद साप्ताहिक विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या मार्गावर अतिरिक्त १० फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

रेल्वे प्रशासनातर्फे गाडी ०३३८० लोकमान्य टिळक टर्मिनस – धनबाद साप्ताहिक विशेष ही गाडी पूर्वी २६ जूनपर्यंतच चालवण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, आता या गाडीच्या कालावधीत ३ ते ३१ जुलैपर्यंत वाढ केली असून ती ५ अतिरिक्त फेऱ्या धावणार आहे. तसेच, गाडी ०३३७९ धनबाद -लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडीही पूर्वी २४ जूनपर्यंतच चालणार होती.

आता ती १ ते २९ जुलै या कालावधीत चालणार असून तिच्या देखील ५ अतिरिक्त सेवा वाढवल्या आहेत. गाडीची रचना २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबे, २ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, ६ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी डबे, ६ शयनयान डबे, ४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि २ जनरेटर कार असतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

या स्थानकांवर असेल थांबा?
कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, मदन महल, कटनी साउथ, ब्योहारी, बरगवां, सिंगरौली, चोपन, रेणुकूट, गढ़वा रोड, डाल्टनगंज, लातेहार, खलारी, पतरातू, राची रोड, बरकाकाना, बोकारो थर्मल, चंद्रपुरा, कतरासगढ़ या स्थानकांवर थांबा असेल.






