---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील वाळूगटांच्या निर्गती प्रक्रियेसाठी ई-लिलावास दुसरी मुदतवाढ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । सन २०२५-२६ या वर्षाकरिता वाळू/रेती गटांच्या निर्गतीसाठी दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजीच्या सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार ई-निविदा (e-Tendering) व ई-लिलाव (e-Auction) प्रक्रियेची अधिसूचना १७ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र सदर प्रक्रियेस अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने दिनांक १ मे २०२५ रोजी प्रथम मुदतवाढ देण्यात आली होती.

valu

प्रथम मुदतवाढीनंतर देखील अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील सहा उपविभागांसाठी सदर प्रक्रियेस दुसरी मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानुसार पुढील कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे:

---Advertisement---

नोंदणी (Registration): दिनांक ६ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून संगणकीय पद्धतीने नोंदणी सुरू होईल. ही प्रक्रिया ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुरु राहील.

तांत्रिक व आर्थिक निविदा उघडणे: दिनांक ९ मे २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता तांत्रिक (Technical) व आर्थिक (Financial) लिफाफ्यांची छाननी व उघडणी होईल.
ई-लिलाव प्रक्रिया: दिनांक १३ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत ऑनलाईन ई-लिलाव पार पडेल.
अंतिम निर्णय: दिनांक १४ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे अंतिम निर्णय घेण्यात येईल.
सदर ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेची सविस्तर माहिती https://mahatenders.gov.in व https://jalgaon.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित व्यावसायिक, कंत्राटदार, उद्योजक यांना ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment