ज्वारी, मका व बाजरी खरेदीसाठी मुदतीत वाढ; जळगाव जिल्ह्यात ९३३७ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण

जून 2, 2025 12:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२५ । किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये ज्वारी, मका व बाजरी या भरडधान्यांची खरेदी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख १५ जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ९३३७ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.

jwari maka

जळगांव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगांव, एरंडोल, पाळधी, म्हसावद, जळगांव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगांव व चाळीसगांव असे एकूण १८ खरेदी केंद्र कार्यरत राहणार आहेत.

रब्बी हंगामातील हमीभाव पुढीलप्रमाणे आहेत :
ज्वारी : रुपये ३३७१/- प्रति क्विंटल
मका : रुपये २२२५/- प्रति क्विंटल
बाजरी : रुपये २६२५/- प्रति क्विंटल
खरेदी कालावधी ०१ जून २०२५ ते ३० जून २०२५ दरम्यान राहणार आहे.

तरी शेतकरी बंधुंनी ज्वारी, मका व बाजरी नोंदणी खरेदीचा लाभ घ्यावा. ऑनलाईन नोंदणी करीता, आधारकार्ड, बँक पासबूक व ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, ८अ इ. कागदपत्रे घेवून वरील खरेदी केंद्रांवर चना, ज्वारी, मका व बाजरी नोंदणी करावी. असे आवाहन मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, विभागीय संचालक संजय वामनराव सावकारे, संचालक संजय मुरलीधर पवार व एस. एस. मेने (प्र.जिल्हा पणन अधिकारी, जळगांव) यांच्या वतीने करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment