⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | बातम्या | तज्ज्ञांचा अंदाज ठरतोय खरा, सोन्याच्या किमतीने तोडले आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड ; पहा आजचा भाव

तज्ज्ञांचा अंदाज ठरतोय खरा, सोन्याच्या किमतीने तोडले आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड ; पहा आजचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज : २० मार्च २०२३ : ऐन लग्नसराईत सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतली आहे. अमेरिकेतील घडामोडींचा भारतीय सराफ बाजारात परिणाम दिसून येतोय. सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले आहे. त्यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे. जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या किमती ५९ हजारावर गेली आहे. दरम्यान यापूर्वी तज्ज्ञांनी सोन्याचा दर ६० हजारावर जाणार असल्याचा अंदाज वर्तविला. तो खरा होताना दिसतोय.

आजचा जळगाव सुवर्णनगरीतील सोन्याचा दर
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचं किमतीत पुन्हा वाढ झालेली दिसून येतेय. आज सोमवारी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव ५९,५०० रुपये इतका आहे. आठवड्याभरात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या सोमवारी सोन्याचा दर जवळपास ५७,२०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. म्हणजेच सात दिवसात सोन्याच्या किमतीत २३०० रुपयांनी महागले आहे.

चांदीचा दर
दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर ६८,४०० रुपये इतका आहे. यापूर्वी गेल्या सोमवारी चांदीचा दर ६४,२०० रुपये इतका होता. म्हणजेच एका आठवड्यात ४२०० रुपयाची वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईत सोने-चांदी दरात मोठी वाढ झाल्याने खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा दर?
दरम्यान, आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) १२ वाजेपर्यंत सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून येतेय. MCX वर सोन्याच्या दर ४५० रुपयांनी वाढला असून ५९,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदी ३३० रुपयांनी वाढली असून ८६,८३० रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह