⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | युवाशक्ती फाऊंडेशनची गणेशोत्सवासाठी कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी प्रितम शिंदे

युवाशक्ती फाऊंडेशनची गणेशोत्सवासाठी कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी प्रितम शिंदे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । युवाशक्ती फाऊंडेशनची गणेशोत्सव 2022साठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी प्रितम शिंदे, उपाध्यक्षपदी रोहीत भामरे, सचिवपदी सौरभ कुळकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, सचिव अमित जगताप, मनजीत जांगीड, राजेश नाईक हे उपस्थित होते.

युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2009 पासून काव्यरत्नावली चौक जळगाव येथे आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सदर गणेशोत्सवात गोरक्षा, संयुक्त कुटुंबाचे फायदे-विभक्त कुटुंबाचे नुकसान, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे व्हिजन 2020, स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील भारतीय युवक, सैन्य दलात नोकरी संधी, पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांचे जीवनपट, विश्वशांती, डॉ. बाबा आमटे यांचे जीवनपट, प्लास्टिक मुळे पर्यावणावरील धोके अशा विविध विषयांवर समाजप्रबोधन होण्यासाठी देखावे सादर करण्यात आले आहेत.

युवाशक्ती फाऊंडेशन ची बैठक नुकतीच संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, सचिव अमित जगताप, मनजीत जांगीड, राजेश नाईक यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडली असून गणेशोत्सवासाठी सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. सदर गणेशोत्सवाचे हे 14 वे वर्ष असून यात अध्यक्षपदी प्रितम शिंदे, उपाध्यक्षपदी रोहीत भामरे, सचिवपदी सौरभ कुळकर्णी, खजीनदार आयुष दस्तुरे, पूजाविधी प्रमुख-तृशांत तिवारी, कार्याध्यक्ष-राहूल चव्हाण, सहकार्याध्यक्ष-यश लोढा, चिटणीस-अजय खैरनार, मिरवणूक प्रमुख-सयाजी जाधव, प्रसिद्धी प्रमुख-भटू अग्रवाल, युवती विभाग प्रमुख-संस्कृती नेवे, देखावा प्रमुख-शिवम महाजन, सांस्कृतिक विभाग प्रमुख-सागर सोनवणे, कार्यकारीणी सदस्य-जयेश पवार, दिक्षांत जाधव, करण जांगीड, महेश लाड, पियुष हसवाल, नवल गोपाल, प्रशांत वाणी, पियुष तिवारी, धनराज धुमाळे, महेंद्र शिंपी, राहूल ठाकूर, अमोल गोपाल, संदिप सूर्यवंशी, प्रशांत गायकवाड, तुषार गायकवाड, भवानी अग्रवाल, भुषण सोनवणे, मयुर जाधव, हितेश सेठीया, पंकज सुराणा, पवन माळी, श्रेयस मुथा, तेजस दुसाने, विक्की धोतरे, यश चोरडीया, मिलिंद पाटील, तेजस जोशी, अतुल कानडे, जितेंद्र अत्तरदे, महेश भालेराव, हितेश पाटील, रोहीत सोनार, संकेत छाजेड, पवन भालेराव, भुषण मंगले, विकास अत्तरदे, अमोल सोनवणे, दीपक धनजे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह