---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

Exclusive : ‘या’ तारखेला उद्धव ठाकरे येणार जळगाव जिल्हा दौऱ्यावर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२३ । शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे २३ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पाचोरा येथे स्वर्गीय तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांच्या स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमासाठी आणि जाहीर सभेसाठी उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यात येत आहेत. (uddhav thakre jalgaon daura )

या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी १५ व १६ एप्रिल रोजी शिवसेना जळगांव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जळगांव व पाचोरा येथे येत आहेत. हा दौरा यशस्वी करण्यासाठी जळगांव जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक तयारीला लागले आहेत.

uddhav thakre 6 jpg webp

अशी माहिती शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख डॉ.हर्षल माने, विष्णू भंगाळे, दिपक राजपूत ,समाधान महाजन ,महानंदा पाटील, वैशाली पाटील, महापौर जयश्री महाजन आणि महानगर प्रमुख शरद तायडे यांनी दिली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---