---Advertisement---
रावेर

खळबळजनक! ९ वर्षीय बालिकेचा अचानक पोटात दुखल्याने मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । पहूर कसबे येथील ९ वर्षीय बालिकेचा अचानक पोटात दुखल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. शाळेचा पहिला दिवस आणि बालदिन तिच्या शाळेचा अखेरचा दिवस ठरला.

jalgaon 2022 11 16T181029.281 jpg webp webp

दिव्या कैलास बनकर (वय ९) असे चिमुकलीचे आहे. ही जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता दुसरीत शिकत होती. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर मंगळवारी शाळेचा पहिलाच दिवस असल्याने ती मोठ्या उत्साहाने शाळेत गेली. बाल दिनानिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमात तिने सहभाग घेतला. मात्र मंगळवारीचा बालदिन तिचा शाळेचा अखेरचा दिवस ठरला.

---Advertisement---

मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तिच्या पोटात दुखू लागले. आई-वडिलांनी लागलीच तिला गावातील खाजगी रुग्णालयातत नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगावला घेऊन जात असतानाच १० वाजेच्या सुमारास दिव्याची प्राणज्योत मालवली. दुपारी शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---