---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र राजकारण राष्ट्रीय

कर्नाटकमध्येही भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनच !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२३ ।  राज्याचे ग्रामविकास, क्रीडा व वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा भाजपचे जेष्ठ व मह्त्वाचे नेते गिरीश महाजन हे राज्याप्रमाणेच कर्नाटकातही भाजपचे संकटमोचक ठरत आहेत. कारण पक्षाने त्यांच्यावर कर्नाटक विधानसभेच्या दहा मतदारसंघांची जबाबदारी सोपविली असल्याचे म्हटले जात आहे.

girish mahajan karnatak 1 1 jpg webp webp

महाजन यांनी यापूर्वी गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला आहे. त्यांनी राबविलेल्या जळगाव पॅटर्नचे आजवर सर्वांनीच कौतुक केले आहे. महाजन गेल्या काही दिवसांपासून बेळगाव जिल्हा ग्रामीण व शहरातील मतदारसंघात प्रचारात आहेत. पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करणे, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन प्रचाराची रणनीती ठरवत आहेत.

---Advertisement---

बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. रवी पाटील तसेच दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत सहभागी होऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधला.

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील उमेदवार नागेश मनोळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार संघातील प्रचार व सभांचे नियोजन ठरविले जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---