⁠ 
शनिवार, मे 4, 2024

तिकीट असले तरी भरावा लागू शकतो दंड ; रेल्वेचा ‘हा’ नियम आताच जाणून घ्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२३ । भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. रेल्वेचा प्रवास हा स्वस्त आणि सुरक्षित मानला जातो. त्यामुळे देशभरातील करोडो लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहेत. मात्र रेल्वे प्रवास करताना आपल्याला काही नियमांचीही काळजी घ्यावी लागते. जर या नियमांचे पालन झाले नाही तर आपल्याला दंडगी भरावा लागू शकतो. आज आम्‍ही तुम्‍हाला रेल्वेच्‍या अशा नियमांबद्दल सांगणार आहोत, ज्‍यामुळे तुमची दंड भरण्यापासून सुटका होऊ शकते.

प्लॅटफॉर्म प्रतीक्षा वेळ
तिकीट काढल्यानंतरही प्लॅटफॉर्मवर ठराविक काळासाठीच आपल्याला थांबता येऊ शकते. जर तुम्ही या नियमांचे (Rules) पालन केले नाही तर तुमच्याकडून रेल्वे मोठा दंड आकारु शकते. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या अशा नियमांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही प्लॅटफॉर्मवर किती वेळ थांबू शकता व त्याचा नियम काय हे जाणून घेऊया

रेल्वेचे दिवस व रात्रीचे नियम वेगळे
जर तुमची ट्रेन दिवसाची असेल तर तुम्ही ट्रेनच्या वेळेच्या दोन तास आधी स्टेशनवर पोहोचू शकता. याशिवाय, जर तुमची ट्रेन (Train) रात्रीची असेल, तर तुम्ही ट्रेन येण्याच्या 6 तास आधी स्टेशनवर पोहोचू शकता.

या वेळेत पोहोचल्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही. रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतरही हाच नियम लागू होतो. ट्रेन आल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त 2 तास स्टेशनवर थांबू शकता. पण जर रात्रीची वेळ असेल तर रेल्वे तुम्हाला 6 तास थांबण्याची परवानगी देते.

या नियमाचा फायदा घेण्यासाठी टीटीईच्या मागणीनुसार रेल्वेचे तिकीट दाखवणे आवश्यक असेल. तुम्ही ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त रेल्वे स्थानकावर थांबल्यास तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागेल. जर तुम्ही दिवसा ट्रेनच्या वेळेपासून 2 तासांपेक्षा जास्त आणि रात्री ट्रेनच्या वेळेपासून 6 तासांपेक्षा जास्त वेळ थांबलात तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागेल. तुम्ही असे न केल्यास, TTE तुमच्याकडून दंड आकारू शकते.