⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

अपात्र झाले तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच !

जळगाव लाईव्ह न्यूज | ८ मे २०२३ |  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालायात लवकरच लागणार आहे. अशावेळी जर शिवसेनेचे 16 आमदार अपात्र होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.आणि जर झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काय होणार ? असाहि प्रश्न नागरिकांना पडला आहे.

या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचक विधान केले आहे. हा जर तरचा विषय आहे. परंतू, आपल्याकडे यापूर्वी अनेक मुख्यमंत्री राहून गेलेले आहेत, जे विधीमंडळाचे सदस्य नव्हते. परंतू मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. पण मला वाटते की या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्याची आपल्याला काहीच गरज नाही. या सगळ्या गोष्टींना अजून बराच वेळ आहे.”अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. (Even if he is disqualified, the Chief Minister of the state is Eknath Shinde!)

याचबरोबर किरेन रिजिजू आणि नार्वेकर यांच्यातल्या या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मी त्यांना चहापानासाठी बोलावले होते. दोघांमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.