सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे कर्मचारी राज्य विमा महामंडळात मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.ESIC Bharti 2025

स्पेशलिस्ट ग्रेड II या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलीय. या भरतीद्वारे एकूण ५५८ जागा भरल्या जाणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर ESIC च्या अधिकृत वेबसाइट esic.gov.in वर जाऊन भरतीची जाहिरात तपासा. त्यानंतर अर्ज करा, हे लक्षात ठेवा की अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 मे 2025 आहे. अर्ज फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale) – 155
शैक्षणिक पात्रता : (i) MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/ Ph.D/ DPM (ii) 05 वर्षे अनुभव
2) स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale)- 403
शैक्षणिक पात्रता : (i) MS/MD,/ M.Ch,/ DM, D.A/Ph.D/ DPM (ii) 03/05 वर्षे अनुभव
इतका पगार मिळेल?
स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale) – 78,800/- तसेच इतर भत्ते
स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale) – 67,700/- तसेच इतर भत्ते
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 26 मे 2025 रोजी 45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असेल. तसेच जनरल/ओबीसी/EWS प्रवर्गातील उमेदवारांना ₹500/- रुपये अर्ज फी लागेल आणि SC/ST/PWD/ExSM/महिला यांना फी नाही.