⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

धरणगाव अत्याचार प्रकरणाचा एरंडोलात निषेध

जलगाईनं लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव येथील दोन अल्पवयीन बालीकांवरील अत्याचार प्रकरणाचा एरंडोल येथील विविध महिला मंडळाच्या पदाधिकारी व सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी निषेध व्यक्त करत दोषींवर जलद गतीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन तहसीलदार सुचिता चव्हाण यांना देण्यात आले.

धरणगाव येथे दोन अल्पवयीन बालिकांवर चंदुलाल मराठे या नराधमाने अत्याचार केल्याची घटना २० रोजी घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी तसेच अत्याचारग्रस्त बालिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावे, दोन्ही बालिकांना शासकीय मदत देण्यात यावी, अत्याचार करणा-या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी, पिडीत बालिकांचा शिक्षणाचा खर्च शासनाने करावा. वयात आल्यानंतर दोन्ही बालिकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहे.

मोर्चात जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, राष्ट्रवादी कोंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंजुषा देसले, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, नगरसेविका छाया दाभाडे, वर्षा शिंदे, सुरेखा चौधरी, प्रतिभा पाटील, नगरसेवक बबलू चौधरी, असलम पिंजारी, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य आनंदा चौधरी (भगत), समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, गोरख चौधरी, राजेंद्र शिंदे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, सुनील चौधरी, डॉ.राजेंद्र चौधरी, तेली समाजाचे अध्यक्ष अनिल चौधरी, चिंतामण पाटील, अजेंद्र पाटील, सुनील पाटील, नितीन महाजन, डॉ.नरेंद्र पाटील, युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन, कुणाल महाजन, अनिल चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी, प्रमोद महाजन, आरती ठाकूर, निशा विंचूरकर, शोभना साळी, डॉ.उज्वला राठी उपस्थित होते.