एरंडोल नगरपालिकेचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण
जळगाव लाईव्ह न्यूज । नितीन ठक्कर । एरंडोल नगरपालिकेचा पाच वर्षाचा कार्यकाळ २८ रोजी पूर्ण झाला. गेल्या पाच वर्षांमध्ये येथील नगरपालिकेने विकासाची झेप घेतली आहे. या कालखंडामध्ये जवळपास ७० से ७५ कोटीचे कामे केले आहे.
पाच वर्षाच्या काळामध्ये झालेली कामे
लमांजन पाणी पुरवठा योजना, डिजिटल आठवडे बाजार, एलईडी लाईट, महाराष्ट्रात प्रथम एसी शौचालय, गावाचे पूर्ण काँक्रिटीकरणचे रोड, पेवर ब्लॉक रोड, मरीआई मंदिर जवळ समशान भूमीचे कामे, एरंडोल नगरीचे शिल्पकार स्वर्गीय मुकुंद दादा परदेशी प्रवेश द्वार आदि विविध विकास कामे या पांच वर्षाच्या काळामध्ये झालेले आहे. तसेच एरंडोल नगरपालिकेला माझी वसुंधरा अंतर्गत जिल्ह्यात प्रथम थ्री स्टार पारितोषिक दिल्लीला राष्ट्रपतीच्या हस्ते मिळाले.
यांनी परिश्रम घेतले
यासाठी सर्व कर्मचारी व नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजपाचे आदिवासी जनजाति विकास मंत्री ऍड. किशोर भाऊ काळकर यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश सिंह परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या पाच वर्षांमध्ये सर्वप्रथम मुख्य अधिकारी म्हणून विशाखा मोटघरे होत्या. त्यांच्या कार्यकाळात हागणदारी मुक्त एरंडोल शहराचे प्रमुख काम करण्यात आले. त्यांच्या पश्चात किरण देशमुख मुख्य अधिकारी म्हणून एरंडोलला मिळाले त्यांचे परिश्रमाने एरंडोलचा चेहरा-मोहरा बदलला. वर्तमान मध्ये विकास नवाळे हे एरंडोलचे मुख्य अधिकारी म्हणून आहेत. एरंडोल स्वच्छ शहर सुंदर शहरसाठी ते भर देत आहे. शहरात त्यांनी प्रत्येक वार्डात दर बुधवारी वृक्षारोपण साफसफाई मोहीम हाती घेतलेली आहे. गावात जागोजागी शहरवासीयांच्या करिता बसण्यासाठी बाकाची व्यवस्था तसेच सरकारी बगीच्या येथे नवीन सौंदर्याला भर दिला जात आहे. त्यामध्ये मुलांसाठी खेळणे, झूले नवीन घसर पट्टी आणलेल्या आहे.
या पाच वर्षांमध्ये जशी शहराने विकासाची घोडदौड सुरू ठेवली आहे. पुढेही सुरू राहावे अशी शहरवासीयांची प्रतिक्रिया आहे.