भरधाव कारच्या धडकेत एरंडोलचा दुचाकीस्वार ठार

जून 12, 2025 7:13 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२५ । भरधाव कार चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात एरंडोलचा दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना मेहुणबारे ते बहाळ रस्त्यावर जामदा गावाच्यापुढे वळणावर घडली. अपघातानंतर कार चालक पळून गेला. संजय काशिनाथ पाटील (वय ५७) रा. ओमनगर, एरंडोल असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident jpg webp

नीलेश हिंमत पाटील रा. लक्ष्मीनगर, एरंडोल हे त्यांचे साडू संजय काशिनाथ पाटील (वय ५७) रा. ओमनगर, एरंडोल यांच्यासमवेत एमएच.१९ ईएल ८००० या दुचाकीने घराकडे जात असताना मेहुणबारे ते बहाळ रस्त्यावर जामदा गावाच्या पुढे वळणावर बहाळकडून मेहुणबारेकडे येत असलेल्या एमएच ५४, ००६७ या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत संजय पाटील हे चालवत असलेल्या दुचाकीला धडक दिली.

Advertisements

त्यात संजय काशिनाथ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरात होती की, अपघात दुचाकीचेही नुकसान झाले. कार चालक अपघाताची खबर न देता पळून गेला.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment