जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे पर्यावरण सप्ताह साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । जमात-ए-इस्लामी हिंदच्या जळगाव शाखेतर्फे ‘पर्यावरण साप्ताह’ नुकतेच साजरा करण्यात आला. त्या बाबत सविस्तर माहिती व सप्ताह आयोजीत करण्यामागील महत्व आणि शहरातील समस्यांसमवेत विविध मागणींसाठी शाखेच्या महिला शिष्टमंडळाने जळगाव शहर म.न.पा. महापौर जयश्री महाजन यांची भेट घेतली आणि त्यांना बदलत्या वातावरणाची ओळख करुन देत शहरातील रस्ते, पाणी आणि सद्ध्याच्या पर्यावरणीय समस्यांविषयी सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत जमात-ए-ईस्लामी हिंद, जळगाव शाखेचे अध्यक्ष शेख सोहेल अमीर यांनी महापौरांना पर्यावरण सप्ताहाची माहिती देतांना सांगितले की, स्थानिक प्रशासनातर्फे वृक्ष लागवड व पर्यावरणाचे रक्षण याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात यावी जेणेकरुन पर्यावरणाबाबत लोकांमध्ये आपुलकी निर्माण होईल तसेच प्राणवायू साठी कसरत घ्यावी लागणार नाही. लोक निरोगी आयुष्य जगू शकतील. आपल्या शहरातील लोक निरोगी व तांदरुस्त असावे हीच आमची इच्छा आहे.
कोविडच्या काळात डोकावता कळते ऑक्सिजनची समस्या इतकी गंभीर आहे की, जर आपण वृक्ष लागवड मोहीम मोठ्या प्रमाणात साजरी केली नाही तर भविष्यात ऑक्सिजनची कमतरता आणि समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारली जावू शकत नाही. म्हणूनच, भविष्यात उद्भवणार्या समस्यांच्या निराकरणासाठी आज जनतेने काळजी घेण्याची गरज आहे.
शिष्टमंडळात जमात-ए-ईस्लामी हिंद जळगावच्या महिला शाखा अध्यक्षा खान नसरीन महमूद यांनी प्लास्टिकच्या सर्रास वापरावर नियंत्रण वा निर्बंध आणावा अशी विनंती केली. त्यसाठी ठोस कारवाई देखील केली पाहिजे.महापौर जयश्री महाजन यांनी जमातच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, अशा सर्व कामांमध्ये प्रशासन जमातसोबत खंबीरपणे उभे आहेच तसेच आवश्यक सहकार्याचे आश्वासन देखील दिले. आणि वृक्षारोपण मोहिमेत जमातच्या सहकार्याची विनंती केली.
या शिष्टमंडळात जमात-ए-इस्लामी हिंदचे स्थानिक अध्यक्ष सोहेल अमीर शेख, महिला शाखेच्या अध्यक्षा नसरीन महमूद, आदिल खान, शबाना मुश्ताक, फरजाना देशमुख आदींचा समावेश होता.