जळगावची विमानसेवा सुरू करण्यासाठी सरसावले उद्योजक

जळगाव लाईव्ह न्यूज। ११ फेब्रुवारी २०२३ । जळगाव विमानतळावरील विमान सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह जळगाव शहरातील उद्योजकांनी केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. यावेळी भरत अमळकर, नंदू अडवाणी व किरण बच्छाव उपस्थित होते.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरानाजीकच विमानतळ उभारण्यात आले आहे. हे विमानतळ उभे असूनही या ठिकाणी विमानसेवा नागरिकांसाठी खुली नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जळगाव शहरातील उद्योजक भरत अमळकर, नंदू अडवाणी व किरण बच्छाव यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सकारात्मक दृष्टिकोनाने जळगावकरांच्या समस्येकडे पाहत लवकरच विषय मार्गी लावावा असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जळगाव विमानतळावर असलेली उड्डाणपट्टी ही लहान आहे. यामुळे मोठी विमान या ठिकाणी येऊ शकत नाहीत. पर्यायी जळगाव विमानतळावरील उडानपट्टी मोठी करण्यात यावी असे आदेश यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अधिकाऱ्यांना दिले. याबाबत लवकरच खासदार उन्मेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगावत बैठक सुद्धा होणार आहे.

11 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता ही भेट झाली. यामुळे विमानसेवेचा हा प्रश्न लवकरच निकाली लागू अशी अपेक्षा जळगावकर करत आहेत.