डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात कार्यशाळा उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमीत्त ‘निवासी वैद्यकीय अधिकार्यांच्या आत्महत्या व घ्यावयाची काळजी’ या विषयावर नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत आत्महत्या रोखण्यासाठी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला प्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. मयुर मुठे यांची प्रमुख उपस्थीती होती. प्रास्ताविकात बोलतांना डॉ. विलास चव्हाण यांनी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन का साजरा करतो हे विषद करून सांगितले. प्रमुख मान्यवर डॉ. मयुर मुठे यांनी चित्रफित व उदाहरणाचा दाखला देत निवासी वैद्यकिय अधिकार्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. यात आत्महत्या करणारी व्यक्ती कशी ओळखावी व त्या व्यक्तीला आत्महत्येपासून कसे परावृत्त करावे याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थीतांचे शंका निरसन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करतांना डॉ. मुठे यांनी वैद्यकिय क्षैत्रातील वाढता ताण तसेच आत्महत्या रोखण्यासाठी उपाय योजनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. विलास चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, महाविद्यालयाचे निवासी वैद्यकिय अधिकारी व विद्यार्थी उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गोविंद यादव, डॉ. मुजाहीद शेख यांनी परिश्रम घेतले.