जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । या सात दिवसाच्या सप्ताहात एरंडोल शहरातील सामाजिक कार्यकर्ते,प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, बाहेर गावाहून आलेले मान्यवर, समाजसेवक, वृक्षप्रेमी प्रतिष्ठित नागरिक यांनी निसर्ग सप्ताहास भेट देऊन मैत्री सेवा फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. व असे सप्ताह गावा गावात भरवले जावेत. असे मान्यवरांनी म्हटले व त्यांनी देखील वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेऊन वृक्ष लागवडीसाठी जनतेला आव्हान केले. तसेंच मैत्री सेवा फाउंडेशन च्या सदस्यांनी देखील सप्ताहच्या शेवटच्या दिवशी प्रत्येकी पाच वृक्ष लावण्याची व संगोपनाची जबाबदारी घेण्याचा संकल्प केला.
या सप्ताह एकूण १४०० वृक्षांचे शासकीय दरात विक्री करण्यात आली यात नीम-२३४, बांबू-१४८, सिताफळ-१०८, गुलमोहर-२७८, जांभूळ-१३६, करंज-१०६, देवकपाशी-११६, आवळा-२०६, ईतर-६८, असे सरासरी १४०० ते १५०० वृक्ष नागरिकांकडून लागवडीचे व संगोपनाचे प्रतिज्ञापत्र घेण्यात आले व फाउंडेशनतर्फे असे आव्हान करण्यात आले.
जे नागरिक कमीत कमी पाच वृक्षांचे एका वर्षापर्यंत निगा राखून संगोपन करतील अशा नागरिकांची निवड करून यांना पुढील वर्षी मैत्री सेवा फाउंडेशनच्या निसर्गमित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल व सर्व वृक्ष प्रेमी,नागरिकांनी मैत्री सेवा फाउंडेशनच्या निसर्ग सप्ताह उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.