⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | बातम्या | मोठी बातमी ! जिल्ह्यातील सहकारी बँकांच्या व उर्वरित संस्थांच्या निवडणुका होणार जाहीर

मोठी बातमी ! जिल्ह्यातील सहकारी बँकांच्या व उर्वरित संस्थांच्या निवडणुका होणार जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | ७ एप्रिल २०२२ । गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे थांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता टप्प्याटप्प्यात घेण्यात येत आहेत. येत्या दोन महिन्यात सहकारी बँक व उर्वरित संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार असल्याची माहिती उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली आहे.

ग सं सोसायटीच्या निवडणुका सुरू असून जून महिन्यात बाजार समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. 2020 च्या मार्च महिन्यापासून संपूर्ण जगामध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे टाळेबंदी करण्यात आली होती. या काळात मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. तसेच सहकारी संस्थांच्या विद्यमान कार्यकारी मंडळाला मुदतवाढ देखील देण्यात आली होती. जिल्ह्यात एक हजार 118 सहकारी संस्थांच्या निवडणुका सहा टप्प्यांत घेण्यात येत असून आतापर्यंत 400 हून अधिक संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत

या संस्थांच्या निवडणुका पार पडणार
धरणगाव अर्बन बँक, जळगाव जनता बँक कॉपरेटिव बँक, चाळीसगाव कॉपरेटिव बँक, पाचोरा चोपडा पीपल्स बँक, गोदावरी लक्ष्मी बँक, मराठा विद्या प्रसारक मंडळाची निवडणूक देखील लवकरच पार पडणार आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह