तर आम्ही ‘कमळ’ चिन्हावर.. आ. किशोर पाटील यांचे मोठं वक्तव्य

ऑगस्ट 13, 2023 4:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२३ । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणूक जिकंण्यासाठी पक्षांकडून तयारी देखील केली जात आहे. दरम्यान, राज्यात सध्या तीन पक्षाचे सरकार असून यात विधानसभेच्या उमेदवारीवरून गोंधळ उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, यातच शिवसेना शिंदे गटाचे पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

MAL Kishor patil jpg webp

आमचा पक्ष अधिकृत शिवसेना आहे, निवडणूक आयोगाने आम्हाला चिन्हही दिलेले आहे. त्यामुळे आम्ही ‘धनुष्यबाण’ चिन्हावरच लढणार आहोत.परंतु, काही तांत्रिक अडचण आली आणि आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला, तर आम्ही ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविण्यास तयार आहोत, असे मत आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केले.

Advertisements

शिवसेना शिंदे गट ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत आमदार पाटील म्हणाले, की आमच्या शिंदे गटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आमचा पक्ष अधिकृत आहे. आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. आमचे चिन्हही धनुष्यबाण आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अडचण आमच्या आमदारांना येणार नाही, अशी आम्हाला खात्री वाटत आहे.

Advertisements

तरीही काही तांत्रिक अडचण आलीच आणि आमचे नेते मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तर आम्हाला मान्य असेल. पक्षात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनाच आहे. आम्ही त्यांचा निर्णय आनंदाने स्वीकारून निवडणुकीत यश मिळवून दाखवू.असंही ते म्हणाले. आज राज्यात भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही २०० पेक्षा अधिक जागा मिळविणारच आहोत, हेच खरे वास्तव आहे, असे मतही आमदार पाटील यांनी व्यक्त केले

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now