---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

Election : मंगरूळ विकासोत सर्व जागांवर शिवसेना विजयी

---Advertisement---

shivsena jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । मंगरूळ वि.का. सोसायटीच्या १२ जागांसाठी १७ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात आली. या चुरशीच्या लढतीत १२ पैकी १२ जागांवर विजय मिळवत मंगरूळ विकासोवर शिवसेनेचा भगवा फडकला.

---Advertisement---


महिला राखीव मतदारसंघातून मंगलबाई रामकृष्ण पाटील व निर्मला आबाजी पाटील , इतर मागसवर्गीय मतदारसंघातून हेमराज गंजीधर पाटील, अनुसुचित जाती-जमाती मतदारसंघातून केवळबाई बापू सोनवणे, सर्वसाधारण मतदारसंघातून शेतकरी संघाचे व्यवस्थापक भरत सोनू पाटील, सुनिल अभिमन पाटील, उदयलाल सुकलाल पाटील, बापू ताराचंद पाटील, भगवान बन्सीलाल पाटील, भरत येवलकर पाटील, सदाशिव हिलाल पाटील व गोरख देवराम पाटील यांनी विजय संपादन केला. या सर्व विजयी उमेदवारांचा आमदार चिमणराव पाटील यांनी सत्कार केला. यावेळी दयाराम पाटील, मधुकर पाटील, नाना पाटील, सखाराम चौधरी, संचालक राजेंद्र पाटील, दीपक पाटील, अशोक पाटील, रावसाहेब पाटील, दिलीप पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---