---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

दुर्दैवी : गिरणाच्या डोहात बुडाल्याने वयोवृद्धाचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । गिरणा नदीच्या डोहात पाय घसरून पडल्याने ६५ वर्षीय वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि.१२ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उत्तम रामसिंग सूर्यवंशी (वय-६५, रा.आमोदा बु.॥ ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे.

images 1 1 jpeg webp webp

तालुक्यातील आमोदा येथील रहिवासी असलेले उत्तम रामसिंग सूर्यवंशी हे शेती व गुरे चारण्याचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. गुरुवार, दि.१० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता ते गुरे चराईसाठी गेल्यानंतर गिरणा नदीपात्रातील गमर्‍या डोहात त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात बुडाले. दरम्यान दोन दिवसानंतर शनिवार, दि.१२ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. यावेळी नातेवाईकांनी त्यांच्या घटनास्थळी धाव घेतली. याबाबत जळगाव तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली.

---Advertisement---

जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सायकर करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---