जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेची निवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. दूध संघामध्ये सर्वपक्षीय पॅनल बांधायचा विचार होत आहे. मात्र भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंसोबत कोणत्याही प्रकारची युती किंवा आघाडी करायची नाही असा पावित्रा घेतला आहे.
अधिक माहिती अशी की, खडसेंना सोबत घेतलं नाही तरच सर्वपक्षीय पॅनल करू. सर्वपक्षीय पॅनलसाठी आम्ही आग्रही अहोत. मात्र पॅनलमध्ये एकनाथ खडसे राहिल्यास आम्हाला असे पॅनल नको आहे. अशी भूमिका मंगेश चौव्हाण यांनी मांडली आहे. यामुळे राजकारण अधिकच तापले आहे.
गेल्या सात वर्षांपासून दूध संघात एकनाथ खडसे यांच्या गटाची सत्ता आहे. त्यात सुरुवातीच्या ६ वर्षात दूध संघात कोणत्याही मोठ्या घडामोडी घडल्या नाहीत. मात्र, गेल्या तीन महिन्यांत दूध संघाचे राजकारण तापले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या ठिकाणी प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. 3 तसेच अनेक प्रकरणांत चौकशीदेखील लावली. त्यात एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात चांगल्याच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीदेखील झाडल्या गेल्या.
त्यामुळे दूध संघाची निवडणूक जिल्ह्यातील या दोन्ही नेत्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असून, दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे आगामी काळात राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.