जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । जिल्हा सहकारी दूध संघातील प्राप्त तक्रारींच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने शासनाला चौकशी अहवाल दिला आहे. त्यात संघात एकूण ९ कोटी ९७ लाखांचा अतिरिक्त खर्च शासनाची परवानगी न घेताच करण्यात आल्याचा आढळून आलं आहे. त्यामुळे याप्रकरणी संचालक मंडळावर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकाराबाबत आ.एकनाथराव खडसे पत्रकार परिषदेत माहिती देत आहेत.
केवळ नाथाभाऊ आणि दूध संघ बदनाम करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. नाथाभाऊला जेलमध्ये टाकून भ्रष्टाचारचे मैदान साफ करण्याचा यांचा उद्देश आहे. मंगेश चव्हाणने कधी म्हैस पाहिली होती का? मंगेश चव्हाण ला विचारा काय होता अगोदर. २०१४ ला दलाली करायचा कुठून आला इतका पैसा? माझ्या बापजाद्याची मालमत्ता होती. दूध संघाचा कधी अनुभव आहे का? दूध संघातील प्रशासक मंडळातील बऱ्याच सदस्यांचा दूध व्यवसायाशी संबंधच नाही. निवडणुकीच्या काळातच भ्रष्टाचार आठवतो, इतर वेळी कुठे जातात. संधी मिळाली तर अधिवेशनात आवाज उठवणार. मी एकटा लढणार आहे, माझ्यामागे मुक्ताईची शक्ती आहे.
केंद्र शासनाची ५० टक्के सबसिडी होती आणि ५० टक्के अल्पदराचे कर्ज आणि त्याला राज्य सरकारची हमी होती. NDDB मार्फत संपूर्ण राबविण्यात आले. पैसे वितरण करण्याचे आदेश समितीला राज्य सरकारने दिले होते. मंदाकिनी खडसे त्यात संचालक होत्या. अध्यक्ष व इतर व्यक्ती शासकीय सदस्य होते. समितीला NDDB च्या खर्चाला मान्यता देण्याचे अधिकार होते. दूध संघाचा त्यात दुरान्वये संबंध नाही. २०१८, १९, २०, २१ या काळात प्रत्यक्ष खर्चात वाढ झाली. तेव्हा जीएसटी नव्हता नंतर त्याची वाढ झाली, किमती वाढल्या. वाढीव किमतीला मान्यता द्यावी यासाठी प्रकल्प समितीने प्रस्ताव तयार करून DDR ला पाठवला. तो विभागीय संचालकांना पाठवला. दोघांनी शिफारस केली. प्रस्ताव मंत्रालयात गेला. मंत्री सुनील केदार यांनी गेल्या महिन्यात त्यास मान्यता दिली. शासन आदेश निर्गमित करण्यापूर्वी नवीन सरकार आले आणि त्यांनी जुन्या आदेशांना स्थगिती दिली, त्यात याचा देखील समावेश होता.
अर्धवट माहितीच्या आधारे नोटीस देण्यात आली. शासन बदलले आणि तात्काळ प्रशासक मंडळाची नेमणूक झाली. लागलीच चौकशी आदेश निघाले आणि वसुलीची कार्यवाही सुरू झाली. सहकार कायद्याचे विकेंद्रीकरण सुरू आहे. ११ रोजी पत्र आणि १८ रोजी कार्यवाही हे तत्परता आहे. प्लांट मध्ये महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आला. संचालक मंडळाला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण सुरू आहे. पारदर्शी काम सुरू आहे. दुसरे काही शोधा, किती बदनाम करणार! दूध संघाला १०० कोटी आणल्यास सागर पार्कवर आरती ओवळणार, असे खडसे यांनी जाहीर केले.