---Advertisement---
जळगाव शहर

एकनाथराव खडसेंसह रोहिणी खडसे यांना ट्वीटरवरून शिवीगाळ

eknath khadse rohini khadse
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व जिल्हा बँक अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना ट्विटर खात्यावरून शिवराळ भाषा वापरत शिवीगाळ केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

eknath khadse rohini khadse

जिल्हा बँक अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी अलीकडेच भाजपाला ओबीसी आरक्षणाचा कळवळा कधीपासून? या आशयाचे ट्विट केले होते. या ट्विटवर सपोर्ट युथ नावाच्या ट्टिटरधारकाने  24 रोजी सकाळी 11 वाजता माजी मंत्री खडसेंसह अ‍ॅड.रोहिणी खडसेंविषयी शिवीगाळ करणारा मजकूर प्रसिद्ध केला. या प्रकरणी शनिवारी अशोक सीताराम लाडवंजारी (जळगाव) यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---