---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

एकनाथ शिंदेंचे बळ वाढतंय : आमदार, खासदारांनंतर नगरसेवकांचाही पाठिंबा, जळगावकर नगरसेवकांचे काय?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । शिवसेनेतून बंडखोरी करीत बाहेर पडलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. सुरुवातीला ११ असलेल्या आमदारांची संख्या आज ४५ वर येऊन ठेपली असून जवळपास १० खासदारांचा देखील पाठिंबा लाभत आहे. एकनाथ शिंदे गटाचे बळ वाढत असून संपूर्ण गट राज्यपालांना पत्र पाठवून स्वतंत्र गट स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांना मुंबई, ठाणे, कल्याणच्या जवळपास ४०० नगरसेवकांचा पाठिंबा मिळणार असल्याचे बोलले जात असून जळगावात एकनाथ शिंदेंच्या बळावर सत्तापालट केलेले आणि मूळ शिवसैनिक काय भूमिका घेणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Jalgaon mnc shivsena

राज्यातील राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत असून दररोज नवीन बातमी कानी येत आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांच्या बळावर स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचा त्यांना पाठिंबा मिळणार आहे. दुसरीकडे शिंदे यांच्या बंडाला प्रत्युत्तर देत स्वतःचे बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेनेने देखील प्रयत्न सुरू केले आहे. शिंदे गटाचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेने अगोदर गटनेता बदलला, त्यानंतर प्रतोद यांनी व्हीप जारी केला होता. आज शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विट करीत अशी मागणी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

---Advertisement---

राज्यातील घडामोडींना प्रचंड वेग आला असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde ShivSena) गटाचे तुल्यबळ वाढतच चालले आहे. विधानसभेत एखादा वेगळा गट स्थापन करण्यासाठी आवश्यकता असलेली मॅजिक फिगर गाठण्यात एकनाथ शिंदे यांना जवळपास यश आले आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे येऊन मिळाले असून आता खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, नुकतेच हाती आलेल्या आकडेवारीनुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४१ आणि अपक्ष ६ असे ४७ आमदार तर उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ १४ आमदार राहिले आहेत. एकनाथ शिंदे गटाला जाऊन सामील होणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहे. आज शिवसेनेत दिसणारे आमदार दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे गटात दिसून येत आहेत.
हेही वाचा : Eknath Shinde In Guwahati : शिंदे गटाच्या प्रवास आणि हॉटेल खर्चाची आकडेवारी आली समोर

राज्यात सध्या शिवसेनेचे १८ खासदार असून त्यापैकी १० खासदार देखील पक्ष नेतृत्वावर नाराज असून ते देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे यांना मुंबई, कल्याण, ठाण्याचे नगरसेवक देखील पाठिंबा देणार असल्याचे म्हटले जात आहे. केडीएमसीमध्ये एकूण ५३ नगरसेवक हे शिवसेनेचे मागच्या निवडणुकीत निवडूण आले होते. यातील ३ नगरसेवक यांचे निधन झाले. तर येणाऱ्या पालिकेच्या निवडणूक डोळ्या समोर ठेवून भाजप आणि मनसेच्या नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता सुमारे ३५ नगरसेवक हे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मर्जीमधील आहेत.

कल्याण लोकसभेतील कळवा, मुंब्रा, दिवा, उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरामधील नगरसेवक देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. बदलापूर नगरपालिकामधील नगरसेवक आणि ग्रामीण भागातील जिल्हापरिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत मधील सदस्य हे शिंदे यांच्या मर्जीतील आणि संपर्कात आहेत. सध्याची परिस्थिती पाहता ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडू शकते. जळगावात देखील गेल्या वर्षी एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून फुटला होता. अद्याप तरी या गटाने एकनाथ शिंदे यांना समर्थन दाखविलेले नसून पुढे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---