---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

‘त्या’ जाहीराती वर एकनाथ शिंदे यांनी केले मोठे विधान !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२३ ।  एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे तुटेल, युती एवढी कमजोर नाहीये. ही युती वेगळ्या वैचारिक भूमिकेतून केलेली आहे. बाळासाहेबांनी ही युती अटलजी होते तेव्हापासून केली. वर्षभरामध्ये यामध्ये जो कोणी मिठाचा खडा टाकला होता, तो आम्ही खड्यासारखा काढून फेकून दिला.

eknath shinde 8 jpg webp

शिवसेनेने नुकतीच एक वादग्रस्त जाहिरात राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांना दिली. यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली. यातच गुरुवारी या दोन्ही नेत्यांनी पालघर येथील कार्यक्रमात आपल्यात कोणताही विसंवाद नसल्याचे स्पष्ट केले. मात्र प्रत्यक्षात व्यासपीठावर एकत्र आल्यानंतर जवळपास 10 मिनिटे या नेत्यांत कोणताही संवाद झाला नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीसांत नक्की काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली.

मात्र आता एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस व आपल्यात कोणताही विसंवाद नसल्याचा पुनरुच्चार केला. एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे तुटेल, एवढी शिवसेना – भाजपची युती कमजोर नाही. देवेंद्र व आमची मैत्री एकदम जोरदार आहे, असेही ते म्हणाले

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---