---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना भावनिक फोन; म्हणाले, तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ११ नोव्हेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला हलविण्याची आवश्यकता होती. यासाठी एअर अँब्यूलन्सची गरज होती मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्यास उशिर होत होता. यासाठी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्याशी संपर्क केला. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातल्या दरे गावाता होते. खडसे यांच्या प्रकृतीची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळताच त्यांनी फोन फिरवून तातडीने आवश्यक ती व्यवस्था केली. आता एकनात खडसे यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करत जी मदत केली त्याबद्दल आभार मानले आहेत.

khadse shinde 1 jpg webp

काय म्हणाले एकनाथ खडसे?
“आपला छोटाच विषय होता. आपल्या दृष्टीकोनातून बहुदा फार मोठाही नव्हता. मला एअर अँब्युलन्स मिळत नव्हती. एक मिळाली ती नाशिकला उभीही होती. मात्र एटीसी क्लिअरन्स मिळत नव्हता. तुम्ही बोलल्यामुळे मिळालं. मी रुग्णालयात आलो. ऑपरेशन थिएटरमध्ये मला नेलं तेव्हा अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला. दोन ब्लॉकेज १०० टक्के आणि तिसरा ७० टक्के होता. परिस्थिती गंभीर होती. पण त्यांनी अँजिओप्लास्टी केली. ती व्यवस्थित पार पडली. कार्डिअॅक अरेस्ट आला.. माझं हृदय १०० टक्के बंद पडलं. त्यावेळी दोन मिनिटांची शॉक ट्रिटमेंट दिली. तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेक ऑफ झालं असतं आणि लँड झालंच नसतं. तुमचे आभार. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा!” असं एकनाथ खडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोनवर म्हणाले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---