⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | उदयनराजेंच्या त्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंचं प्रत्त्युत्तर ; पहा काय म्हणाले ..

उदयनराजेंच्या त्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंचं प्रत्त्युत्तर ; पहा काय म्हणाले ..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२३ । भाजपा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजकीय निवृत्तीवर भाष्य केलं होतं. उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्यावर आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रत्युत्तर दिल आहे

एकनाथ खडसे म्हणाले, “केंद्र सरकारची ज्येष्ठ नागरिकाची व्याख्या लक्षात घेतली तर ६० वर्षांवरील जेवढे लोक असतील ते सर्वजण सेवानिवृत्त होतात. त्यामध्ये उदयनराजेही बसतात. त्यामुळे उदयनराजेंनी एक ठरवलं पाहिजे की, आता मी ज्येष्ठ नागरिक झालो आहे, आता राजकारणात मलाही रस नाही.

शरद पवारांना जसं राजकारणातून निवृत्त व्हा, अशा सूचना दिल्या जातात. तसेच ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नेत्यांना राजकारणातून निवृत्त करण्याबाबत योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा.” असं एकनाथ खडसे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते उदयनराजे?
शरद पवारांच्या निवृत्तीवर भाष्य करताना उदयनराजे भोसले म्हणाले, “माझी निवडणुकीची हौस भागली आहे. बघता बघता पन्नाशी कधी ओलांडली समजलं नाही. शाळा आणि कॉलेज कधी संपलं, हेही कळालं नाही. आता कुठेतरी प्रत्येकानं थांबलं पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय असते. तसे, राजकीय नेत्यांनाही लागू केलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक राजकीय नेता लोकांचा आग्रह असल्याने उभं राहिलो, असं सांगतात. शरद पवार यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं. कारण, मुख्यमंत्री आणि केंद्रातही अनेक वर्षे ते मंत्री राहिले आहेत. अनेकांना वाटतं शरद पवारांकडून मार्गदर्शन घ्यावं. त्यामुळे शरद पवारांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणं, मला योग्य वाटतं.”

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.