⁠ 
सोमवार, मे 20, 2024

एकनाथ खडसेंचा मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२३ । मराठा आरक्षणासाठी जालन्यात मराठा (Maratha Arakshan) आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) हे गेल्या १४ दिवसांपासून उपोषणाला बसले असून याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांनी शिंद सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे.तसेच पुढे बोलताना शासनाला हा प्रश्‍न चिघळवायचा असल्याचे दिसून येत आहे. लोकांमध्ये संताप निर्माण होण्याअगोदर शासनाने केंद्र सरकारच्या माध्यमातून घटना दुरूस्ती करून हा प्रश्‍न तातडीने सोडवावा, असंही खडसे म्हणले.

तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण अधिकच तीव्र केलं आहे. याच मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेत शिंदे सरकारने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.