⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | ईडीकडून संजय राऊतांची चौकशी, आता एकनाथराव खडसेंचं मोठं वक्तव्य

ईडीकडून संजय राऊतांची चौकशी, आता एकनाथराव खडसेंचं मोठं वक्तव्य

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । मुंबईतील पत्राचाळ जमीन प्रकरणी ईडीचे पथक शिवसेनेचे (Shivsena)खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर घरी आज सकाळीच पोहोचले आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अशातच दुसरीकडे राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनीही आता चौकशी प्रकरणी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप केला आहेत.

भोसरी जमीन गैरव्यवहारा संदर्भात सुरू असलेली चौकशी आता लाचलुचपत विभागाकडे देण्यात आली आहे, यावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. वेगवेगळ्या चौकशीच्या माध्यमातून मला अडकवण्याचा प्रयत्न आहे. मला जेलमध्ये टाकल्यावर यांच्यासाठी रान मोकळे आहे, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी प्रत्यक्ष नाव न घेता, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

भोसरीतील भूखंडाची चौकशी अनेक वेळा झाली आहे. झोटिंग समितीने चौकशी केली. पुण्याच्या लाचलुचपत विभागाचे चौकशी करून यामध्ये कुठलाही दोष नाही. कुठलाही भ्रष्टाचार नाही, कुठलीही अनियमितता नाही म्हणून हा एफआयआर रद्द करावा, या संदर्भामध्ये पुणे सत्र न्यायालयामध्ये त्यांनी क्लोजर रिपोर्ट दीड महिन्यापूर्वी दिला आहे. नाशिक लाचलुचपत विभागानेही या प्रकरणाची चौकशी करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नाही, असा अहवाल दिला आहे. आता ईडीच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे, असंही खडसे यांनी सागितलं.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.